अज्ञात वाहनाच्या धडकेत मजुर ठार

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कपील नगर वस्ती येथील तरुण मजुर पायदळ कामावर जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना दि १५ सोमवार रोजी घडली.

दिपनगर औष्णिक विद्युत केद्राच्या जवळच असलेल्या कपील नगर वस्तीतील  रहिवाशी लवकेश रामदास प्रधान (वय ३६ ) हे  सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दिपनगर येथे मजुरीच्या कामास पायदळ जात असताना त्याच्या पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यात तो जागीच ठार झाला.

याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला रितेश रामदास प्रधान यांच्या खबरी नुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात अपघाताची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मनोहर पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.