महाविकास आघाडीला जोरदार धक्का; राणेंनी गड राखला

0

सिंधुदुर्ग, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकरता भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी पुन्हा एकदा आमने सामने आले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत यानिमित्ताने पाहायला मिळाली होती.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून आमदार नितेश राणेंच्या पाठीमागे चौकशीचा समेरीमा लागला असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या गटाने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत महाविकास आघाडीच्या गटाचा धुव्वा उडवण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचा ९ जागांवर आतापर्यंत विजय झाला आहे तर महाविकास आघाडीला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत जे महविकास आघाडी पॅनलचे प्रमुख होते त्यांना पराभवचा धक्का बसला आहे. वेंगुर्ल्यातील संचालक पदाची लढाई ही अत्यंत महत्वाची मानली जात होती. भाजपचे उमेदवार मनीष दळवी यांच्यावर अनेक आरोप यावेळी करण्यात आले होते. मात्र तरीही मनीष दळवी यांचा दणदणीत विजय झाला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पराभव मान्य केला आहे. हा निकाल अनपेक्षित आहे असं देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. राणे समर्थकांनी थेट गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. नारायण राणे कुटुंबियांवर गेल्या महिन्यापासून अनेक आरोप करण्यात आले होते. मात्र कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेऊन राणेंचे वर्चस्व सिंधुदुर्गवर एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. १९ जागांसाठी सिंधुदर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागली होती. १४ जागांचे निकाल सध्या हाती आले आहेत ज्यात स्पष्टपणे नारायण राणे यांच्या पॅनलला विजय मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.