मराठा आरक्षणासाठी जळगावात कँडल मार्च

0

जळगाव : अंतरवाली सराटी येथे मनोज पाटील जरांगे हे आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ आपण सर्व मराठा समाज बांधव एकत्र येऊन जरांगे पाटलांना आपल्याला आरक्षण मिळविण्यासाठी शंभर टक्के साथ द्यावी. त्यासाठी हा वणवा गावागावात पेटवा. असे आवाहन मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते तथा उद्योजक प्रा. डी. डी. बच्छाव यांनी केले.

जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सकल मराठा

समाजाच्या वतीने कैंडल मार्च काढण्यात आला. समाज बांधवांनी घोषणा देत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा दिला. यावेळी जळगाव शहरातील प्राध्यापक, वकील, उद्योजक, व्यावसायिक यासह विविध क्षेत्रातील समाज बांधवांची हजारोंच्या संख्येत उपस्थिती होती. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समाजबांधवांनी एकत्र येत शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या कँडल मार्चला समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र दिसून आले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यभरात वातावरण तापले असून त्याचे पडसाद आता जळगाव जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्या दिशेने जिल्ह्यात देखील मराठा समाजातर्फे पावले उचलले जात आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.