बीडमधली मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळणानंतर बीडमध्ये बससेवा ठप्प

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बीडमध्ये बससेवा ठप्प झाली आहे. शेकडो बस बसस्थानकातच थांबून असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. अनेक प्रशी बस्थानकात तर काही प्रवाशी बसमध्येच अडकून पडले आहे.

मराठा आरक्षणावर सरकार कोणताच निर्णय घेत नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील जालण्यात आमरण उपोषणाला बसले आहोत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहेत. दरम्यान बीडमध्ये हिंसक वळण लागल्यानंतर रात्री बस पेटवून देण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा एक बस फोडण्यात आली आहे. त्यामुळे बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. शेकडो बस बस्थानकात उभ्या आहेत आणि त्यामुळे आता प्रवाशांचे मोठे हाल सुरु झाले आहेत.

आम्ही आज सकाळी संभाजीनगरवरून बसमध्ये बसलो. मात्र बीड शहरात येण्यापूर्वी रास्ता रोको आंदोलन सुरु होते. त्याठिकाणी बस अर्धा ते पाऊण तास थांबवली. त्यानंतर बीड शहरातील बस स्थानकात आलो. मात्र आता पाच ते सहा तासांपासून इथंच आहोत. खिशात पैसे नाहीत, सकाळपासून उपाशी आहोत. आता आम्ही जायचं कसं? असा सवाल संभाजीनगरवरून मुखेडला जाणाऱ्या प्रवाशांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.