भाजप-शिवसेनेने सरकार स्थापन करावे – शरद पवार

0

मुंबई: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला राज्यातील जनतेने सत्ता स्थापनेचा कौल दिला आहे. आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत काम करू. त्यामुळे भाजप-शिवसेनेने सरकार स्थापन करावं बाकी याबाबत बोलण्यासारखं काहीही नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार मुंबईतल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत यांनी १७० चा आकडा कुठून आणला ते माहित नाही. आज त्यांनी माझी जी भेट घेतली ती सहज भेट होती. त्यांची आणि माझी भेट कायमच सकारात्मक होते तशी ती आजही झाली. वेगळं समीकरण असण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.


भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गेली २५ वर्षे एकत्र राहिलेले पक्ष असून त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि दोन्ही पक्षांनी मिळून सरकार बनवावे, असे पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध पक्षात बसण्याचाच निर्णय लोकांनी दिला आहे. आम्ही आणि काँग्रेस १०० या आकड्याच्या पुढे जात नाही, त्या मुळे आमचे सरकार कसे बनेल, असे पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आणि विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचे आपले म्हणणे पुन्हा अधोरेखित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.