भाजपा इच्छुकांची ‘तिसी’ पार ,राष्ट्रवादी ‘वेट अँड वॉच’ !

0

शिवसेनेची पण तयारी सुरू, तर वंचित आघाडी चा उमेदवारी जाहीर

चाळीसगाव (आर डी चौधरी):- चाळीसगाव विधानसभा मतदार संघात भाजपाच्या ईच्छुक व महत्त्वाकांक्षी संभाव्य  जवळपास तिस ते पस्तीस उमेदवारांनी तिकीटाची मागणी केली आहे.

चाळीसगाव विधानसभा मतदार संघात 2009 हा अपवाद वगळता सतत पंचवीस वर्ष भाजपच्या उमेदवाराचे वर्चस्व राहिले आहे .देशात पुन्हा मोदी सरकार आल्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी चे प्रमाण जास्तच वाढले आहे . राज्यात होत असलेल्या इन्कमिंग चा परिणाम चाळीसगावात दिसून येत नाही . इच्छुकांची जरी संख्या जास्त प्रमाणात असली, तरी निवडून येण्याचा निकस म्हणून जिल्हा पातळीवरून वरिष्ठांकडे चाळीस गावातून चार संभाव्य उमेदवारांची नावे पाठवली असल्याचे समजते.

चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार उन्मेश पाटील खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांचे पाठीराखे , व्यावसायिक मित्र व समर्थक   युवा उद्योजक ,श्री मंगेश चव्हाण यांची आमदारकीसाठीची   मनीषा काही लपून राहिली नाही. त्यांनी कधी भाजपाच्या बॅनरखाली तर कधी मंगेश चव्हाण मित्र  मंडळाच्या माध्यमातून अल्पावधीतच तालुक्यात  सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक ,क्रीडा ,क्षेत्रात मदतीचा ओघ सुरू करून आपले नाव घराघरात पोचविले. त्यामुळेच खासदार उन्मेश पाटील यांचा गट विभागला गेला आणि त्याच विभागणीचा फायदा म्हणून तालुक्यातील भाजपचे सर्व जुने कार्यकर्ते एकत्र आली व त्यांनी मुंबई येथे  सर्व वरिष्ठांच्या भेटी घेऊन यावेळेस पक्षाची उमेदवारी ही  जुन्यापैकी की कोणालाही द्यावे असा सूर लावला. म्हणून जुन्यापैकी जळगाव जिल्हा भाजपचे अध्यक्ष डॉक्टर संजीव पाटील व किसान सेलचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांची वर्णी लागती का? किंवा नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीत खासदार उन्मेश पाटील यांना चाळीसगाव तालुक्यातून 65 हजाराचा लीड मिळाल्याने त्यांची तालुक्यासाठी आशा पल्लवित झाली आहे त्यासाठी त्यांनी त्यांची धर्मपत्नी सौ संपदा पाटील यांचे नाव पुढे केले आहे. सौ संपदा पाटील यांना उमेदवारी खेचून आणण्यासाठी  ते किती वजन खर्ची करतात याकडे सुद्धा तालुक्याचे लक्ष लागले आहे .तर दुसरीकडे त्यांचे एकेकाळचे समर्थक व बहुजन समाजाचा युवा नेता उद्योजक मंगेश चव्हाण हे नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. त्यांनी अल्पावधीतच आपल्या कार्याची चुणूक चाळीसगाव करांना दाखवून दिली. त्यामुळे मंगेश चव्हाण यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते, चाळीसगाव करांचे त्यांच्या उमेदवारी कडे किंवा ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

भा ज पा व शिवसेनेची युती होते किंवा होत नाही अशी अवस्था असतांनाच चाळीसगाव विधानसभेच्या जागेसाठी सेनेने आपले संभाव्य उमेदवार मुंबई येथे बोलवून त्यांना तयार राहण्याचे आदेश दिलेत. तर या संभाव्य उमेदवारांमध्ये जळगाव जिल्हा सेनेचे उपप्रमुख पप्पू उर्फ उमेश गुंजाळ व चाळीसगाव तालुका सेनेचे अध्यक्ष रमेश आबा चव्हाण यांची नावे आघाडीवर आहेत,

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी असल्यामुळे ही जागा जवळपास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असल्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून माजी आमदार राजीव देशमुख  यांच्यावरच पक्षाने विश्वास टाकला असून  सध्या त्यांची भूमिका वेट अँड वॉच अशी आहे .कारण शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीत काही फेरबदल होऊ शकतो .

वंचित बहुजन आघाडी ने आधीच बंजारा समाज चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याने बंजारा समाजातील युवा उद्योजक डॉक्टर मोर सिंग राठोड यांची उमेदवारी जाहीर करून अनेकांना धक्काच दिला. कारण राजकीय जाणकारांचे मत असे आहे की वंचित आघाडी मुळे अनेकांचे राजकीय समीकरण बिघडू शकते.

तसेच ज्या  महत्त्वाकांक्षी व सक्षम उमेदवारांना राजकीय पक्षाचे तिकीट न मिळाल्यास कोणता संभाव्य उमेदवार अपक्ष लढण्याची तयारी करतो याकडेही ही तालुक्या वासियांचे लक्ष लागून आहे परंतु यावेळेस चाळीसगाव विधानसभा मतदार संघात चौरंगी किंवा पंचरंगी लढत पाहावयास मिळेल हे मात्र निश्चित

Leave A Reply

Your email address will not be published.