विनाअनुदानित शाळांना अखेर न्याय !

0

-राज्याध्यक्षा -सौ.शुभांगीताई पाटील  यांचे प्रयत्न यशस्वी

भडगाव (प्रतिनिधी) :  मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य अघोषित शिक्षक समिती तर्फे विद्यालयांना अनुदान मिळण्यासाठी सरकार व कर्मचारी यांच्यात संघर्ष सुरू होता.

या समितीच्या राज्याध्यक्षा सौ.शुभांगी  पाटील व अघोषित समिती यांना अखेर यश मिळाले व या सर्व विद्यालयांना 20%अनुदान देण्यात निर्णय शासनाने जाहीर केला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याच्या  अघोषित शिक्षकांनी वेळोवेळी पाठपुरावा करून अनेक आंदोलने करून उपोषण करून वेळप्रसंगी काठ्यालाठ्या  खाऊन आदोलने  केली. परिणामी शेवटी शासनाला जाग आली ,व या विनाअनुदानित अघोषित शाळांना 20%अनुदान देण्याचा निर्णय शासकीय पातळीवरून जाहीर करण्यात आलायांना प्रत्यक्ष अनुदान हे माहे १ एप्रील २०१९पासुन मिळणार आहे हे शिक्षक मागील १०ते १५ वर्षापासून अखंड ज्ञानदानाचे काम करत होते यांना या वर्षापासून आपल्या हक्काचा पगार मिळणार आहे यासाठी हे शिक्षक व त्यांचे कुटुंब आनंदी असून त्यांनी समितीचे आभार मानले आहे अघोषित शिक्षक समितीच्या राज्याध्यक्षा सौ . शुभांगी पाटील , मार्गदर्शक विवेकजी सुर्यवंशी , उपाध्यक्ष विवेक पाटील , जळगाव जिल्हाध्यक्ष निलेश वाघ , उपाध्यक्ष राकेश पाटील, तसेच नितीन पाटील , निलेश पाटील , विजय महाजन , गौरव भोळे, नितीन पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे सर्वसमाजातुन कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.