महानगरपालिकेकडून प्लॅस्टीकबंदी मोहिम

0

विघटन होत नसलेले प्लॅस्टीक जमा करावे- आयुक्त

जळगाव (प्रतिनिधी) : महापालिकेतर्फे दि. 11 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान प्लॅस्टीक मुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेकडे विघटन न होणारे प्लॅस्टीक(सिंगल यूज) जमा करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी केले. प्लॅस्टीक मुक्त अभियान मोहिमेच्या पार्श्वभूमीवर व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत बुधवारी ते बोलत होते. यावेळी उमविचे संचालक पंकज नन्नवरे, एकता व्यापारी असो. चे अध्यक्ष ललीत बरडीया, उपायुक्त  मिनीनाथ दंडवते, अजित मुठे, प्रभाग अधिकारी उदय पाटील, आरोग्य विभागाचे समन्वयक महेंद्र पवार, व्यापारी बांधव, बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

पंतप्रधान नद्र मोदी यांनी दि. 25 ऑगस्ट रोजी मनकीबात या कार्यक्रमात या मोहिमेचा उल्लेख केला आहे. त्यानुसार सदरचा कार्यक्रम शहरात राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तर व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्लॅस्टीक कॅरीबॅग्ज शिवाय व्यवसाय होत नसल्याचे म्हणणे मांडले. बचत गटाच्या सदस्यांनी वार्डावार्डात परवानगी दिली तर प्लॅस्टीक गोळा करण्यास तयार आहोत.ज्या प्लॅस्टीकचे विघटन होत नाही ते मनपाकडे देवू आणि उर्वरित प्लॅस्टीक विकून आम्हाला चार पैसे मिळतील असे मत मांडले.

व्यापारी संकुलात विशेष गाडी

शहरातील व्यापारी संकुलात आठवड्यातून दोन दिवस भंगार प्लॅस्टीक गोळा करण्याचे नियोजन करत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच डायपर व सेनीटरी नॅपकीन वेगळे पॅक करुन लाल मार्क करुन द्यायच्या सूचनाही महिलांना देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.