भाजपातील एका व्यक्तीने इतकं छळलं की फाशी घेण्याची वेळ आली होती ; एकनाथ खडसे

0

जळगाव : भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपमधल्या एका व्यक्तीने मला छळलं अशा शब्दात टीका केली आहे. आता फक्त दोनच पक्ष राहिले. यापुढे महाविकासआघाडी आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार अशी गर्जनाही एकनाथ खडसेंनी केली. ते जळगावच्या मुक्ताईनगर इथं बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.

‘मला अक्कल शिकायला चालले होते. मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पार्टीला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसाने छेळलं.’ असं म्हणत खडसेंनी देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला आहे. मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं. गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले असंही म्हणत खडसेंनी भाजपवर टीका केली आहे.

खडसेंचा फडणवीसांवर घणाघात

ज्या ताटात खातात त्याच थाटात शेंद करणारा मी नाही. तर शेतामध्ये काय उगवतं तर टरबूज असा नाव न घेता खडसेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. भाजपाने एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. मला या पक्षातून छळ करत ढकलण्यात आलं. त्यामुळे यंदा भाजपचं सरकार हे कोणामुळे आलं नाही. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अशी थेट टीक करत चाळीस वर्षात एकही आरोप माझ्यावर नव्हते. पण या दीड वर्षात बाईपासून ते विनयभंगांपर्यंत खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. असं काय झालं नाथाभाऊचं अजूनपर्यंत याचं उत्तर मला मिळालेले नाही असंही खडसे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.