वाघडू येथील आदिवासी भिल्ल वस्तीवरचा ५० वर्षानंतर मिटला अंधार

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वाघडू येथून जवळच असलेली आदिवासी भिल्ल वस्तीत 15/20 कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून राहतात. मात्र जशी वस्ती झाली तसे त्यांच्या नशिबी अंधारच होते. त्यांना आजही वाटत होते की ते आजही पारतंत्र्यात आहेत की काय??  पण बाब वाघडू येथील कार्यकर्त्यांनी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या लक्षात आणून दिली असता त्यांनी आपल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुमारे ६.५० लक्ष रुपये यासाठी प्रस्तावित केले व आज त्या वस्तीवर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वीज पोहचल्याने त्याचे उद्घाटन आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी आदिवासी भिल्ल कुटुंबबियांनी आमदारांचे औक्षण करत त्यांना पेढे भरवले. आज फक्त आमच्या घरात वीज पोहचली नसुन आमच्या जीवनात प्रकाश देण्याच काम आमदार साहेबानी केल असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य पोपटतात्या भोळे, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, आबा पाटील, मधुकर पाटील, राहुल पाटील, गुलाब पाटील, मनोज पाटील, रवींद्र पाटील, सुदाम पाटील, बाप्पु पाटील, अमोल पाटील, अरूण पाटील, गणेश पाटील, बाळासाहेब पाटील, अनिल पाटील, छगन गायकवाड, भगवान गायकवाड, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते…

Leave A Reply

Your email address will not be published.