कुऱ्हा काकोडा परिसरातील हजारो भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

0

कुऱ्हा काकोडा (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी प्रथमच कुऱ्हा काकोडा परिसरात दौरा केला.

यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष रविंद्र भैय्या  पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ उपस्थित होते.

यावेळी त्यांनी डोलारखेडा,नांदवेल, चिंचखेडा बु, वायला, महालखेडा, टाकळी, वडगाव, निमखेडी बु,बोदवड इच्छापूर ,चारठाणा येथे भेटी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतल्या.या प्रत्येक गावातील शेकडो भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

तर संध्याकाळी कुऱ्हा काकोडा येथे कमलसेठ गोयनका यांच्या घरासमोर कुऱ्हा काकोडा येथील आणि परिसरातील काही गावातील पक्ष पदाधिकारी यांच्या प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कुऱ्हा येथे एकनाथराव खडसे यांचे आगमन होताच फटाके, बँड पथकाद्वारे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले ,या कार्यक्रमात यावेळी भाजप शहराध्यक्ष अवधुत भुते,माजी सरपंच ओमप्रकाश चौधरी  ,ररणजीत गोयनका, भागवत सेठ राठोड ,राजकुमार खंडेलवाल ,रमेशसेठ खंडेलवाल,माणिक पाटील मयूर साठे  माणिक पाटील, सुशील भुते ,शंकर मोरे यांच्यासह 300 कार्यकर्ते आणि सुळे, पारंबी,हलगोटा,लालगोटा येथील  पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला .

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जि प सदस्य रविंद्र नाना पाटील, राष्ट्रवादी किसानसेल जिल्हाध्यक्ष सोपानराव पाटील, बाजार समिती सभापती निवृत्तीभाऊ  पाटील,जिल्हा सरचिटणीस ईश्वरभाऊ रहाणे,तालुकध्यक्ष यु डी पाटील सर,महिला आघाडी तालुकाध्यक्ष लताताई सावकारे,माजी सभापती दशरथभाऊ कांडेलकर,विलास धायडे, राजुभाऊ माळी,माजी जि प सदस्य सुभाष पाटील,ह भ प विशाल महाराज खोले,रामभाऊ पाटील,रविंद्र दांडगे, राजेश ढोले, शेषराव पाटील,कल्याण पाटील,सुभाष टोके, सुनिल काटे, शिवराज पाटील,मुन्ना बोडे,दोमोदरे,सुभाष खाटीक,योगेश कोलते, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.

कुऱ्हा येथे सभेत मनोगत व्यक्त करताना जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आज प्रथमच आम्ही तुमच्या सोबत संवाद साधण्यासाठी आलो आहोत.

आपणा सर्वांना विचारून आणि सल्ल्याने आम्ही पक्ष प्रवेश केला आहे गेले चाळीस वर्षांपासून आपण नाथाभाऊ यांच्या पाठीशी उभे आहेत असेच कायम उभे राहा आपल्या परिसराचे नंदनवन होण्यासाठी नाथाभाऊ यांनी कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजना मंजूर करून काम सुरू केले आहे मागील सरकारच्या काळात आपल्याला निधी न मिळाल्या मुळे या योजनेचे काम बंद पडले आहे नाथाभाऊ यांच्या माध्यमातून आणि पाठपुराव्याने हे काम नक्कीच मार्गी लागेल आणि नाथाभाऊ यांनी मतदारसंघात सुरू केलेला विकासरथ असाच दौडत राहील.

यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर नाथाभाऊ, रोहिणी ताई यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते मनापासून स्वागत करत आहेत.

नाथाभाऊ यांचे अभ्यासू नेतृत्व असल्या कारणाने त्यांच्या शब्दाला सरकारमध्ये शासन दरबारी मोठे वजन आहे त्यामाध्यमातून आपल्या परिसरातील राहिलेले विकास कामे उपसा सिंचन योजना पूर्णत्वास जातील.

यावेळी मार्गदर्शन करताना एकनाथराव खडसे म्हणाले राज्यात गेल्या काळात भाजपाची सत्ता होती, तर जलसंपदा खाते गिरीश महाजन यांच्याकडे होते. मात्र, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या भागातील कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन,बोदवड उपसा सिंचन ,मुक्ताई उपसा जलसिंचन या योजनांचे काम रखडले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे पक्षाविषयी काय योगदान ? मी आमदार-़खासदार नसलो तरी माझ्यात काम करण्याची धमक आहे. कारण पक्ष प्रवेशाच्या वेळी शरद पवारांकडुन मी शब्द घेतला आहे. अपूर्ण राहिलेल्या योजना पुर्ण करण्यासाठी मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.

मि स्पर्धेक असल्याने माझ्या विरोधात विविध प्रकारचे आरोप लावण्यात आले. माझा छळ करण्यात आला एवढंच काय तर विनयभंग सारखा गुन्हा दाखल करण्याचे नीच राजकारण करण्यात आले. ज्या पक्षाला मी लहानाचे मोठे केले तो पक्ष सोडावा वाटत नव्हता. मात्र आपलेच गद्दार झाले त्यामुळे कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असे वाटले. मी पक्ष सोडला नाही मला सोडायला भाग पाडले, असे एकनाथराव खडसे म्हणाले. तालुक्यातील कुर्हा परिसरातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते.

खडसे पुढे म्हणाले की, मला पक्षाने भरपूर दिले, असे सांगितले जाते. मात्र मीही माझ्या आयुष्याची चाळीस वर्षे दिली आहेत. मुलगा गेल्यानंतरही पक्षासाठी उभा राहिलो आहे.  मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. माझी छळणूक सुरुच राहीली.

मी पक्ष सोडला काय चुक केली, अन्याय होत असतांना पक्षात कायम असल्याने कार्यकर्ते पक्ष सोडण्यासाठी दबाव आणत होते, म्हणून निर्णय घ्यावा लागला. पक्षाने एका व्यक्तीचे लाड केल्याने संपूर्ण महारष्ट्राच वाटोळे झाले आणि मिळणार असलेली सत्ताही गेली. ही व्यक्ती कोण हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मला तिकीट मिळणार नाही हे भाजपचे राष्ट्रीय समन्वयक असलेले डॉ. राजेंद्र फडके हे माझ्या व्याह्यांना आधीपासुन सांगत होते. मला तिकीट मिळणार नाही हे यांना कसे अगोदरपासून माहित होते ? अगोदर कोणत्या बैठकीत कट केला असेल तरच ते होऊ शकते. आपली भाजपाच्या विरोधात नाराजी नाही, फक्त एकात व्यक्तीबाबत आहे, असे एकनाथराव खडसे म्हणाले.

दिवसभरातील दौऱ्यात 

डोलारखेडा येथे सरपंच  नितीन पाटील, उपसरपंच सुरेश कोळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांनी चिंचखेडा बु येथेय सरपंच सौ भाग्यश्री ताई पिळोदकर,शिवाजी क्षिरसागर, सदाशिव तायडे, समाधान खोदले, बाबू कोकाटे, जगन तायडे, ,अर्जुन पिळोदकर,निलेश पाटील,प्रमोद वाघ, पंडित पिळोदकर,पुरुषोत्तम पिळोदकर,दिपक पाटील, श्रीकृष्ण बावस्कर, सतिष कांडेलकर, स्वप्नील पाटील,प्रकाश गावंडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य ,विकासो सदस्य, टाकळी येथे  माजी सरपंच लक्ष्मीबाई चव्हाण, रसाळ भाऊ चव्हाण, बाळूभाऊ चव्हाण, राजुभाऊ चव्हाण, श्रावण चव्हाण, कांतीलाल चव्हाण, नितीन निकम, भारत धनसिंग ,किसनभाऊ पवार ,जयंतीलाल फकिरा जाधव,विमल राठोड, धोंडू बन्सी राठोड, वायला येथे सोपान लालचंद पाटील, बाजीराव झावरू पाटील, प्रकाश निंबाजी वाघ, छन्नू तोताराम पाटील, अनिल ठाकरे, साहेबराव कुंभार, रमेश निना पाटील, उखर्डू सोनवणे, रामा ठाकरे, रविंद्र ठाकरे, युवराज मोरे, विलास बाजीराव कोळी  नांदवेल येथे मुरलीधर पाटील, शांताराम रावजी पाटील, विनायक पाटील, जगदेव पाटील, सुरेश पाटील, संजय पांडे, सुरेश वानखेडे, अशोक वाघ, रतीराम पाटील इच्छापुर येथे सुरेश वानखेडे, नितीन निंबोळे, रमेश वानखेडे,जनार्धन वानखेडे, संजय भडांगे,राजु भडांगे,विनोद लहामागे, विजय धात्रक, शंकर खिर्डेकर,श्रीकृष्ण खिर्डेकर, अंबादास भोई, मोहन धात्रक, विजय तांदळे, बाळू गोरे, सुरेश ढोले, मधुकर किन्हेकर, बाबुराव बोडे, बाळासाहेब भोई, देवराम बेलदार, विशाल येरुकर, दिपक येरुकर, सोपान बुटे, पवन बेलदार, पवन भोई, अभिषेक बोडे, अंबादास किनेकर, शांतीलाल बेलदार, शुभम वानखेडे, मुकेश वानखेडे निमखेडी  बु येथे जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक सुभाष भाऊ टोके, सौ रंजना ताई कांडेलकर,शांताराम पाटील, हिरालाल तायडे, शरद गाजरे, रंगलाल रायपुरे, जितेंद्र चौधरी, निवृत्ती निंबोळकर,पंडित धात्रक, संदेश झोपे, सुनिल कांडेलकर, बाबुराव मुंढाले,सुभाष वसंत पाटील, गोविंद सावळे, शांताराम वरकड, बाळू मोसे ,राजू पटेल, बोदवड  येथे ज्ञानदेव महादेव मांडोकार मा. सरपंच,प्रल्हाद भोनाजी कोंगळे मा. सरपंच,साहेबराव आनंदा कोंगळे,  सुनिल मुकुंदा कोंगळे मा. उपसरपंच,राजु बाबुराव पुरकर ग्रा.पं.सदस्य,योगेश रामेश्वर इंगळे ग्रा.पं.सदस्य, सुरेश नारायण इंगळे ग्रा. पं. सदस्य, अशोक हरी तलवारे ग्रा.पं.सदस्य, शांताराम विश्वनाथ काहाते ग्रा.पं.सदस्य,दयाराम शालिग्राम बाविस्कर ग्रा.पं.सदस्य, योगेश गुलाबराव बाउस्कर मा. शहर अध्यक्ष, प्रविण प्रल्हाद इंखारे, रामजी रामदास मोरे मा. शहराध्यक्ष,कैलास भोनाजी कोंगळे, मिलिंद तुकाराम तायडे, देवराज पांडुरंग तायडे, संदीप उत्तम इंगळे, संजय मुरलीधर पुरकर,धनराज मुरलीधर सिरसाट, संजय मुरलीधर चिकटे,  मनोहर गायकवाड,वाल्मिक हटकर, कडू कोळी, विकास कोंगळे,पुंजाजी कोंगळे महालखेडा, वडगाव येथे मुकेश पंडित पाटील (ग्रा.पं.सदस्य महालखेडा), नितीन राजाराम पाटील (ग्रा.पं.सदस्य महालखेडा), पुरुषोत्तम रघुनाथ पाटील (महालखेडा), धनराज रामभाऊ पाटील (महालखेडा), शांताराम इंगळे, ज्ञानदेव किसन पाचील, बाबुराव किसन पाटील, संजय दगडु भोलाणकर, तेजराव बिलावर, विनोद बाबुराव बिलावर (भाजपा शाखाध्यक्ष महालखेडा), शांतिलाल पुंडलिक बनिये, विकास जनार्दन बनिये, युवराज हरचंद कांडेलकर, विलास सोनवणे, अशोक सुरळकर, प्रकाश लक्ष्मण कांडेलकर, संतोष सोपान पाटील, अनिल पंढरी पाटील, कैलास सूर्यभान कांडेलकर, शिवदास सांगळकर, सुभाष बुडखले, विशाल अशोक पाटील, गणेश श्रीपत पाखरे, भागवत शांताराम इंदुरे, बाळु प्रभत पाटील, जगन्नाथ वामन वाघ (वडगाव), लीलाधर वामन वाघ (वडगाव), एकनाथ वामन वाघ (वडगाव), एकनाथ मारोती कांडेलकर, प्रभाकर दगडु कांडेलकर, तेजराव भोलाणकर, गणेश युवराज कांडेलकर, मयुर भोलाणकर, रामलाल निशाणकर, बाळु लक्ष्मण पाटील, योगेश रतिराम कांडेलकर विजय देविदास बुडूखले, गणेश रामदास कांडेलकर, प्रशांत जुनारे, सुनिल रतिराम कांडेलकर,  संजय श्रीपत पाटील, विलास नारायण कांडेलकर, शालीकराम वाल्मिक कांडेलकर, संतोष वासुदेव कांडेलकर, पंढरी नामदेव पाटील, अक्षय बाळु पाटील, गणेश पुरुषोत्तम पाटील, अमोल सोपान पाटील, कैलास गणेश पाखरे (वडगांव), कैलास सुरेश तायडे (वडगाव), सागर गुलाबराव पाटील, सुमित शुरपाटजे (वडगाव), सुरेश पाखरे (वडगाव), भागवत भोलाणकर (वडगाव) राजु सोनाजी वाघ, विकास मनोहर पाटील, राजु जनार्दन पाटील, विजय सुधाकर पाटील, अमोल सोपान पाटील, श्रीकृष्ण सोनार, विकास सांगळकर, प्रमोद मनोहर पाटील, रामभाऊ भोलाणे (वडगाव), धनराज सोनार, बंडू सोनार (वडगाव), जितेंद्र कांडेलकर, देविदास कांडेलकर, नामदेव वामन पाटील, कैलास पर्वत पाटील, अशोक सुरळकर, प्रकाश कांडेलकर, रमेश पाखरे, नितीन पाटील (वडगाव), लक्ष्मण सदाशिव पाटील, रामु कांडेलकर, सचिन कडु पाटील यांच्यासह हजारो भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.  एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे कुऱ्हा परिसरात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पहायला मिळाले

Leave A Reply

Your email address will not be published.