ग्रामीण भागातील मेंढगे जोशी समाजाच्या भटकंतीवर आधारित (चिमण्या) चित्रपटाचा शुभारंभ

0

चिखली– दि.५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील घनमोडी मानमोडी या छोट्याशा पुनर्वसनापासून  वर्षानुवर्षे रखडलेल्या पैंनगंगेतीरी असलेल्या छोट्याशा  गावातील मेढंगे जोशी समाजाच्या भटकंतीवर व त्यांचा ज्या नंदी बैलावर उदरनिर्वाह चालतो त्या चिमण्या नावाच्या नंदीबैलाने आपल्या मिठाला जागत आपल्या मालकासाठी  स्वामी निष्ठा पणाला लावून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता एका चिमुकल्या बालकाचा प्राण वाचवण्यासाठी स्वतः च दिलेलं बलिदान  त्याचे मूर्तिमंत चित्रण रेखाटण्याचे काम  घानमोडी मानमोडी येथीलच एका ध्येयवेड्या शेतकरी पुत्रांने करण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर युवकाने लहानपणापासून आपल्या डोळ्यासमोर या उपेक्षित समाजाची भटकंती बघितलेली असून त्या समाजाच्या व्यथेकडे लक्ष वेधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी याच गावी शेतकरी नेते  रयत क्रांती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल धंदर, मनोज जाधव,अनिल वाकोडे,यशपाल लहाने यांच्या उपस्थितीत  शुभारंभ करून माय मराठी   चिमण्या या चित्रपटात उपेक्षित मेढंगे जोशी समाज व स्वामीनिष्ठ नंदी बैल यांचा जीवनपट  रेखाटण्याचा पुरेपूर प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे, जिथे रक्ताचे नाते प्रेम भावना विसरून स्वार्थापोटी दुरावले आहेत,  भाऊ भावाचा, मुलगा बापाचा इतकंच नाहीतर पोटच्या मुलींवर देखील जन्मदाते बापच कर्दनकाळ ठरत असल्याच्या घटना रोज  प्रसारमाध्यमांद्वारे झळकत असतात.

तसाच जोशी समाजाची उदरनिर्वाह,भविष्य सांगून पोटाची खळगी  भागवणारा प्राणी असलेल्या नंदी बैलावर व त्याच्या मालकाप्रती असलेल्या प्रेम भावना ,त्याग,सपर्पण ,स्वामी भक्ती याविषयी हृदय पिळवटून टाकावं अस चित्रण या चित्रपटात करण्यात येत आहे,या निमित्ताने चित्रपट निर्मीतीत प्रथमच पदार्पण करणारे शेतकरी पुत्र गणेश जाधव यांनी आपल्या गावातील मेढंगे जोशी समाज व जिल्ह्यातील नवोदित कलाकारांना ही वाव मिळावा या उद्देशाने सदर चित्रपटाची निर्मिती जिल्ह्यातच  सुरू केली.

सदर चित्रपटाचे चित्रण,बुलडाणा जिल्ह्यातील घनमोडी मानमोडी,ईसोली,वरखेड,भोरशी,लोणार,शेगाव सह मुबंई, पुणे,लोणावळा,इंदोर या ठिकाणी देखील होणार असल्याचे चिमण्या चित्रपटाचे लेखक, दिगदर्शक असलेले सतीश ढोणे यांनी सांगितले,सदर चित्रपटाला संगीत सुरेश घायवट मुंबई यांनी दिले असून डिओपी अनुप वाकोडे ,या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्री अनुराधा भावसार असून यांनी पाणी या बहु चर्चित चित्रपटात मुख्य भूमिका केलेली आहे, सरला गवळी,मदन गायकवाड, गणेश शिंदे,विजया कातकडे,  किरण मॅडम अमरावतीकर,सुनील बोरकर,राहुल क्षीरसागर, गोविंद साळवे महादू साळवे,आश्विन वानखेडे यांच्यासह बाल कलाकार म्हणून निसर्ग ढोणे व आकाश  ढोणे आदी कलाकार असून सदर  चित्रणाप्रसंगी रयत क्रांती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील, सुनिल धंदर,गणेश जाधव, जिवन जाधव, अमोल पाटील, मनोज जाधव, समाधान ढोरे,यशपाल लहाने ,संजय ढोरे,स्वराज ढोरे पाटील आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.