बुध्दिबळ राज्य पंच परीक्षेत आकाश धनगर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या  ऑनलाइन बुध्दीबळ राज्यपंच बुध्दिबळ परीक्षेत आकाश धनगर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. तसेच नुकतेच ऑल इंडिया चेस फेडरेशनतर्फे  घेण्यात आलेल्या राष्ट्रीय बुध्दिबळ प्रशिक्षक परीक्षा देखील त्याने उत्तीर्ण केली आहे.

आकाश धनगर जैन स्पोर्ट्स अकॅडमी आंतरराष्ट्रीय मानांकन असलेला बुध्दिबळ खेळाडू आहे. तसेच कबचौ उमवी बुध्दिबळ संघाचा कर्णधार सुध्दा आहे.  भोपाळ येथे झालेले अखिल भारतीय आंतरविद्यपीठ बुध्दिबळ स्पर्धत कांस्यपदक मिळवून दिलं आहे. क्रीडाक्षेत्रा बरोबर आकाश याने सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात जळगाव शहराचे नावलौकिक प्राप्त केले आहे. राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून आकाशने  राष्ट्रीय व राज्य शिबीरात उत्कृष्ट कामगिरी केले.

महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट स्वयंसवेक पुरस्कार प्राप्त झाला आहे.  त्याच्या या यशाबद्दल जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष अतूल जैन, सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारूक शेख व जैन स्पोर्ट्सचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, फिडे ऑर्बिटर प्रविण ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.