चोपडा येथे चलनात आढळल्या 3000 रुपयांच्या बनावट नोटा

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

चोपडा येथे एक्सिस बैंकेच्या शाखेत असणाऱ्या रीसायकल मशीनमधे भरणा केलेल्या 500 रुपयांच्या  6 नोटा असा ऐकूण 3000 हजार रुपये किमतीच्या  नोटा भरणा करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ग्राहक कांतिलाल प्रेमलाल गुजर,याने एक्सिस बैंक CMS या मशीनमधे आठ हजार पाचशेच्या 17 नोटांचा भरणा केला.  मात्र खात्यावर 5 हजार 500 रुपयांचाच  मेंसेज आला म्हणून त्यांनी बैंकेच्या अधिकाऱ्यांना  विचारपुस केली, त्यावेळी बैंक खात्याची तपासणी केली असता, त्यात फक्क्त 5 हजार पाचशे रुपयेच  जमा झाल्याचे सांगितले.

नंतर  मशीनमधे सर्व डिटेल चेक केल्यावर कळले की, त्या नोटा बकेटमधे आहेत, आणि 3 हजार रुपये किमतीच्या एकूण 6 नोटा आहेत, तेव्हा पुन्हा त्या नोटा यू, व्ही,आणि सॉर्टिंग मशीनमधे चेक केल्यावर त्या बनावट असल्याचे निदर्शनात आल्यावर कांतिलाल प्रेमलाल गुजर यांनी मुद्दाम  खऱ्या असल्याचे भासवले आणि चलनात आणल्या.

म्हणून कांतिलाल प्रेमलाल गुजर रा.निमगवहान यांच्यावर बैंकचे उपशाखा व्यवस्थापक तुषार संतोष पाटिल यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली, त्या अनुशंगाने शहर पोलिस स्टेशन येथे CCTS भाग 5 गुन्हा 260,2021 भा द वी 489 ब,489 क कलमनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक अवतारसिंग चौहान यांच्या मार्गदर्शना नुसार पोलिस उपनिरीक्षक अजित सावले हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.