बीएचआर गैरव्यवहार प्रकरणाशी काडीचाही संबंध नाही; आ. मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली स्पष्टोक्ती

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहाराशी किंवा त्यासंबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी तसेच सुनील झंवर याच्याशी माझा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिले.

आज जळगाव येथील भाजपा कार्यालयात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते म्हणाले की, आज जिल्ह्यातील महावितरणाची सद्यस्थिती अतिशय दयनीय आहे. महावितरण आणि  शेतकऱ्यांच्या समस्येबाबत आम्ही विधिमंडळ आवाज उठवला, मात्र तिथे देखील आमचा आवाज दाबण्यात आला आणि अधिवेशन लवकर आटोपण्यात आलं. त्यांनतर बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळण्यासाठी मी जे प्रतीकात्मक आंदोलन केलं. कारण सरकारला जाग यावी, सरसामान्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहचल्या पाहिजेत. तसेच विरोधी पक्षाचे आमदार तसेच सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला.  माझ्या  मतदार संघात अनेक समस्यांवर आवाज उठवून आंदोलन करून एक विरोधी पक्षाचा आमदार म्हणून प्रखर भूमिका निभावत असल्याने मला जाणीवपूर्वकपणे  अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तसेच चव्हाण म्हणले की, सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला बीएचआर पतसंस्था घोटाळ्यासंबंधी माझे नाव जोडले जात आहे. सुनील झंवर आणि त्या पतसंस्थेतील व्यवहाराबाबत माझ्याविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता प्रकरणात माझा किंवा माझे  कुटुंबीय आणि माझ्या मालकीच्या असलेल्या कंपनीचा, पतसंस्थेतील  जागा खरेदी प्रकरण अथवा पावत्या मॅचिंग करण्याबाबत काहीच संबंध नाही,  असे देखील प्रतिपादन त्यांनी केले.

आ. मंगेश चव्हाण यांची महत्वपूर्ण  पत्रकार परिषद… Live

Leave A Reply

Your email address will not be published.