पारोळा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

0

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा येथे शिवजन्मोत्सव शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मराठा सेवा संघाच्या वतीने दि १९ फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यादिवशी शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळी शिवतीर्थ स्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक करण्यात आले, त्यानंतर मराठी शाळेच्या आवारात असलेल्या राणी लक्ष्मीबाई स्मारकाचे पुजन करण्यात आले, तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले तसेच भवानी गड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुजन करण्यात आले . तसेच जिजाऊ हाॅल मराठी शाळा क्रं १ येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सकाळी एन इ एस हाॅयस्कुलच्या प्रांगणातुन शहरातील विविध भागांतून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.रॅलित छत्रपती शिवाजी महाराजांचा सजिव देखावा सादर करण्यात आला होता. जो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता . तसेच
शहरातील गावहोळी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी सर्व पक्षीय राजकिय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

तर सायंकाळी शिव कॉलनी येथून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच सायंकाळी ७ वाजेपासून एन इ एस हाॅयस्कुलच्या प्रांगणात सातारा येथील शिवशाहीर शिवश्री राजेंद्र कांबळे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी सार्वजनिक शिवजयंती उत्साव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी जिजाऊ ब्रिगेड चे सर्व कार्यक्रर्ते शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.