अमळनेर येथे शिवजयंतीनिमित्त शिवपहाट कार्यक्रम

0

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड च्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त जिजाऊ प्रवेशद्वार जवळ शिवपहाट कार्यक्रम घेऊन विविध गीते ,पोवाडे सादर करण्यात आले.
१९ रोजी पहाटे पाच वाजता तहसील कार्यलयाबाहेरील जिजाऊ प्रवेशद्वाराजवळ राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ आणि शिवचरित्रावर वसुंधरा लांडगे , कैलास पाटील , उज्वल पाटील , रवी पाटील , आर बी पाटील , अजय भामरे यांनी प्रबोधन गीते ,पोवाडा , व पाळणा सादर केला त्यांना ढोलक वादक सपकाळे ,युवराज महाजन यांचे सहकार्य लाभले. भल्या पहाटे गीतांनी वातावरण छत्रपतीमय झाले होते. या कार्यक्रमास डॉ विलास पाटील , प्रेमराज पवार व विविध क्षेत्रातील नागरिक हजर होते. सूर्य उजाडल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.
त्याचप्रमाणे मराठा समाजातर्फे मराठा मंगल कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील , उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख , सचिव विक्रांत पाटील ,कोषाध्यक्ष महेंद्र बोरसे , एस एम पाटील,स्वप्नील पाटील ,कैलास पाटील , संजय पुनाजी पाटील , ज्ञानेश्वर पाटील ,गोकुळ पाटील ,सुलोचना वाघ यांनी छत्रपतीच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.