खा. संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा

0

 

नाशिक , लोकशाही न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकसोबत ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एका पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी बदनामीकारक उल्लेख केला, असा दावा करत योगेश शिवाजी बेलदार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. बेलदार हे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. नाशिक शहरात असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यात योगेश बेलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून भादंवी कलम ५०० प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शाहयांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर पलटवर करत असतांना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चाटूगिरी असा शब्द वापरला. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.