जळगावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराजनिमित्त त्यांच्या पुतळ्यास आज सकाळी ११ वाजता महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते मल्ल्याअर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील पहिल्या मजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.


या कार्यक्रमाच्या प्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, व आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्याअर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी उपायक्त( महसूल) गणेश चाटेलोक संघर्ष मोर्चाच्या . प्रतिभाताई शिंदे, सहाय्यक आयुक्त /ग.स. सोसायटीचे चेअरमन उदय पाटील , व मुकुंद सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यालय अधीक्षक अविनाश बाविस्कर,शाखा अभियंता मनीषा अमृतकर,, स्वीय सहायक अशोक भारुळे, संजय लोंढे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.