चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रम

0

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने 19 फेब्रुवारी 2023 च्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे सकाळी ९ वाजता पूजन , आरती करण्यात आली.

यावेळी प्रमुख अतिथी गुलाबराव पाटील, सदाशिव आप्पा, किशोर गवळी, तमल देशमुख, अनिताताई शिंदे, कैलास पाटील, मनोज बागुल, कांबळे सर, बोरवले काका, प्रशांत देशमुख यांचा सत्कार करण्यात आले. शिवजयंती निमित्त पल्लवी तुपे मॅडम, तेजस्वी तुपे, पूजा तुपे यांनी भाषण केलेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. निबंध स्पर्धेत ४०विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. मराठा महासंघाच्या वतीने विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

तसेच मराठा महासंघ व माझी वसुंधरा नगरपरिषद संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण तसेच मागील वर्षी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री तुपे मॅडम यांनी केले. त्यांचा देखील मराठा महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी *अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष खुशाल बिडे, सल्लागार नामदेव तुपे,शहर उपाध्यक्ष संजय पाटील, शहर सचिव रामचंद्र सूर्यवंशी, सहसचिव दत्तात्रय जगताप, शहर संघटक मोतीराम मांडोळे, रवींद्र पाटील, शिवसेनेच्या अनिताताई शिंदे,महिला तालुका संघटक सोनाली बोराडे, आत्माराम वाघ , नितीन शिंदे, पुंडलिक माळी, मनोज वडनेरे, दुशिंग, नितीन चव्हाण, भास्कर चव्हाण, विशाल जाधव, विठ्ठलराव जाधव, ज्ञानदेव वाघमोडे ,आधी मराठा महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.