नोटबंदी बद्दल केंद्र सरकारनं देशाची माफी मागावी- संजय राऊत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

केंद्र सरकारने पाच वर्षापूर्वी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांना बंदी घातली होती. या निर्णयाला आजच्या दिवशी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. नोटबंदी बद्दल केंद्र सरकारनं संपूर्ण देशाची माफी मागायला हवी, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. तसेच त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावरही टीका केली.

जे. पी. नड्डा यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलंय महाविकास आघाडी सरकार उखडून फेका. जे. पी. नड्डांनी अगोदर कश्मीरमधील दहशतवादी उखडून फेकल पाहिजेत. आणि मग महाविकास आघाडी सरकारचं पाहाव, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नोटबंदीच्या निर्णयाला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यावर बोलताना, केंद्र सरकारने नोटबंदी बद्दल देशाची माफी मागायला हवी अशी टीका केली आहे.

भाजपाची भूमिका मी समजू शकतो. महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करुनही महाविकास आघाडी सरकारच्या केसालाही धक्का लावता आला नाही. केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून दहशत, दबाव, पैसा वापरूनही सरकार पडत नसेल तर वैफल्य येणे स्वाभाविक आहे. जेपी नड्डा हे एक सद्गृहस्थ आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार उखडून फेका असे सांगितले आहे. त्याच्या आधी त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने घुसखोरी केली आहे आणि गाव वसवलेले आहे आधी ते उखडून फेकले पाहिजे. जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी वाढले आहेत त्यांनी ताबडतोब उघडून फेकले पाहिजे.

अरुणाचलमधून चीनला आणि काश्मीरमधून दशतवाद्यांना या दोघांना उघडून झाले की मग त्यांनी महाराष्ट्राकडे वळावे आणि जी काही राजकीय उखडबाजी करायची आहे ती करावी. लोकशाही मार्गाने एखादे सरकार हलवण्याचा अधिकार दुसऱ्या पक्षाला आहे. पण उखडण्याची भाषा करायची असेल तर ती सीमेवर चीनने गावे वसवली आहेत त्यांना उखडण्यासाठी तुम्हाला काही करता येत असेल तर देश त्याविषयी समजून घेण्यासाठी उस्तुक आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी नोटबंदीच्या वेळी भष्ट्राचार, दहशतवाद कमी होईल असे म्हटले होते असे विचारल्यानंतर याबाबतही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काश्मीरमध्ये सर्वात जास्त दहशतवाद वाढला आहे. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार गेल्या पाच वर्षामध्ये वाढला आहे. त्यामुळे नोटबंदी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. आर्थिकदृष्ट्या संकट आल्याने शेकडो लोकांना प्राण आणि नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. नोटबंदीच्या निर्यणाबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मागायला हवी,” असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.