नवीन बस स्थानकातून शेतकऱ्याची पन्नास हजारांची रोकड लांबवली

0

जळगाव-जामनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने एमजे कॉलेज येथून बँकेच्या शाखेतून रोकड काढल्यानंतर घरी परत जाण्यासाठी नवीन बस स्थानकातून त्यांची पन्नास हजार रुपयांची रोकड लांबवण्याचा प्रकार 28 रोजी दुपारी घडला याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा येथील शेतकरी संजय प्रल्हाद पाटील हे शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत असून त्यांची शेती पाटबंधारे विभागात शासनाच्या ताब्यात गेल्याने त्याचा मोबदला म्हणून त्यांच्या एम जे कॉलेज येथील पीपल बँकेच्या शाखेत सव्वा लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याने ती घेण्यासाठी ते जळगाव येथे आले होते. त्यांनी शाखेतून रक्कम काढून घरी परतण्यासाठी जळगावच्या नवीन बस स्थानकातून बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील पन्नास हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना 28 रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. त्यांनी तात्काळ जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.