रांगा लावण्यावरून मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये हुज्जतबाजी, सात जणांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव -शहरातील कोर्ट चौकात गणेश विसर्जन दरम्यान मंडळांच्या वाहनांच्या रांगा लावल्याच्या कारणावरून 28 रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी काही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडून हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील कोर्ट चौकात अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणूकीत रांग लागण्याच्या कारणावरून काही कार्यकर्ते हुज्जत घालत होते. शहर पोलिसांनी हस्तक्षेप करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पोलिस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 7 जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक फौजदार संगीता खांडरे करीत आहेत.

 

यांच्याविरुद्ध झाला दाखल गुन्हा

आयुष गांधी, कैलास नारायण सोनवणे, कल्पेश कैलास सोनवणे, गौरव साकला, गोविंद पंडित, अजय गांधी, सागर भीमराव सोनवणे सर्व राहणार जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.