धक्कादायक ,चोपडा तालुक्यात अठरा वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

0

चोपडा ,जीवे मारण्याची धमकी देऊन पिडितेवर बलात्कार करून निर्जनस्थळी सोडले , सहानभुती दाखवून आणखी तीन अनोळखी नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यात घडली असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

चोपडा तालुक्यातील एका गावात पीडित तरुणी एकटी असतासंना संशयित गफूर गबू तडवी याने दि. ३ जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पिडीतेचा घरात शिरला. त्याने पिडीतेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला यावल तालुक्यातील किनगाव येथे बोलवून घेतले. त्याठिकाणी सरकारी दवाखान्याचे बांधकाम होत निर्जनस्थळी घेवून जात तेथे पुन्हा अत्याचार केले आणि तरुणीला एकटेच सोडून तो तेथून पसार झाला. दि.४ रोजी रात्रीच्या सुमारास तरुणी एकटीच असल्याचे दिसताच दारुच्या नशेत असलेल्या तीन अनोळखी इसमांनी तरूणीला सहानुभूती दाखवित तिच्यावरसामुहिक अत्याचार केला. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणीने तिच्यावर झालेल्या आत्याचाराची आपबिती आपल्या कुटुंबियांना सांगितली. त्यांनी अडावद पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गफूर तडवी याच्यासह अन्य तिघांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता..

 

दरम्यान पोलिसांनी तत्काळ तडवी सह  प्रतीक राजेंद्र कोळी वय 20,पंकज बुधा कुंभार वय 26,आणि अमोल शत्रुघ्न कोळी वय 23 या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.    पुढील तपास सहाय्यक् पोलिस निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहेत.

दरम्यान महाविद्यालयीन तरुणीवर चौघांनी केलेल्या अत्याचारामुळे संपुर्ण जिल्ह्यात खळबळ माजून गेली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनी पीडितेच्या

कुटुंबियांची भेट घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.