देशात ओमिक्रॉनचे 1,270 रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक केसेस

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवसेंदिवस देशात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहे. आता देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 1,270 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचे सर्वाधिक 450 आणि 320 रुग्ण आहेत. ओमिक्रॉनच्या 1,270 रुग्णांपैकी 374 रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिलीये.

देशात कोरोनाचे 16,764 नवीन रुग्ण

देशात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूचे 16,764 नवीन रुग्ण आढळले आहेत. 7,585 बरे झाले आहेत. तर, 220 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 4,81,080 वर पोहोचली आहे. त्याचवेळी, एकूण रुग्णांची संख्या 3,48,38,804 झाली आहे. गेल्या 24 तासात 91,361 सक्रिय रुग्ण नोंदवले गेले आहेत. एकूण रुग्णांपैकी 0.26 टक्के सक्रिय आहेत. तर रिकव्हरी दर सध्या 98.36% आहे.

24 तासांत लसीचे 66,65,290 डोस

गेल्या 24 तासांत लसीचे 66,65,290 डोस देण्यात आले आहेत. एकूण लसीकरणाचा आकडा 1,44,54,16,714 आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च  नुसार, काल भारतात कोरोनाच्या 12,50,837 नमुना चाचण्या करण्यात आल्या, कालपर्यंत एकूण 67,78,78,255 नमुना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे 5,368 नवे रुग्ण, ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 450 वर

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 5,368 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या आकड्यात आदल्या दिवशीच्या संख्येपेक्षा 1,468 ने वाढ झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 66,70,754 झाली आहे. तर दिवसभरात 1,193 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, 22 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात 18,217 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.55% एवढे झाले आहे. सध्या राज्यात 1,33,748 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1, 078 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात काल कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिरक्रॉनचे 198 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 450 वर पोहोचली आहे.

जगभरात ओमिक्रॉनची प्रकरणे 

काल देशात कोरोनाव्हायरसचे 13,154 नवीन रुग्ण आढळले. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 82,402 आहे. देशातील एकूण प्रकरणांमध्ये त्याचा वाटा फक्त 0.24 टक्के आहे. तर, कोरोना रिकव्हरी रेट 98.38 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. देशात 2 डिसेंबर रोजी ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता आणि आता त्याची संख्या 1200 च्या वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, जगभरातील 121 देशांमध्ये ओमिक्रॉनची 3.30 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 59 लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.