शिक्षक कर्मचारी दिव्यांग आहे किंवा नाही याबाबत स्वयंघोषणापत्र देण्यास टाळाटाळ का? – प्रशांत पाटील

0

चिखली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

२० सप्टेंबर रोजी रयत क्रांती संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्याकडे तालुक्यातील दिव्यांग शिक्षकांची व शिक्षणाधिकारी (प्राथ) जगताप साहेब जि. प. बुलढाणा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांच्या विषयी माहिती मागवून चौकशीची मागणी केली होती परंतु त्यांना अध्याप पर्यंत कुठली ही माहिती मिळालेली नसल्याने त्यांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन विचारपूस केली असता अद्यापपर्यंत पूर्ण माहिती मिळाली नसल्याने समरणपत्र काढून माहिती मागवली आहे.

जि.प.मधील दिव्यांग शिक्षक,विषय शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची माहिती व मे  २०१८ मध्ये इतर पं.स. मध्ये बदलून गेलेले त्या वेळी दिव्यांग नसलेले परंतु १८/८/२०२१ च्या बदली दरम्यान दिव्यांग म्हणून बदलून आलेल्यां दिव्यांग शिक्षकांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.

त्यात त्यांनी  जि.प. मधील दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांची नावासहीत माहिती तसेच दिव्यांग कर्मचारी कधीपासून दिव्यांग आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात यावी. ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांचे पाल्य मोठया प्रमाणात जि. प. शाळेत शिक्षण घेत आहेत व कुठेतरी बोगस दिव्यांग शिक्षकांमुळे त्या पाल्यांचे भविष्य अंधारात असल्याचे दिसत आहे, यामध्ये शिक्षक, विषय शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी नोकरी करतात दिव्यांग शिक्षक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असतात तसेच दरवर्षी दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने वाढतांना दिसत आहे,जि. प .ने १८/८/२०२१ रोजी बदली यादी प्रकाशित केली होती, त्यामध्ये २०१८ मध्ये इतर पं. स. मध्ये बदलून गेलेले शिक्षक  सदर यादी मध्ये तेंव्हा दिव्यांग नव्हते परंतु  बरेच शिक्षक कर्मचारी या यादी मध्ये दिव्यांग दिसत आहेत, आधी सुदृढ असलेले शिक्षक पं.स.बाहेर बदलून गेल्यावर दिव्यांग कसे होतात हे न उलगडणारे कोढे असल्याचे त्यांनी म्हटले होते.

सदर दिव्यांग शिक्षकांविषयी चौकशी लावावी, तसेच आपण १५/९/२१ रोजी दिव्यांग यांची सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करावी असे जे पत्रक काढलेले आहे त्यात दिव्यांग या यादीमध्ये जिल्ह्यातील ज्या शिक्षक कर्मचारी यांची सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध होणार आहे त्यामध्ये सेवापुस्तिकात नोंद असणारे व नोंद नसेल तर अश्यांना आपल्या स्तरावरून तात्काळ नोंद करण्याचे आदेश देण्यात यावे.

जिल्ह्यात आपल्या आधीनस्त असणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सर्वच दिव्यांग शिक्षक सेवाज्येष्ठता यादीत येतील व जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचार्यांचा खरा आकडा समोर येईल तसेच जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षक कर्मचाऱ्यांचे दिव्यांग आहे किंवा नाही याबाबत स्वयंघोषणापत्र आपणा कडे घेण्यात यावे व मला त्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी देण्यात यावी.

व गेल्या तीन वर्षांपासून रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळावा म्हणून बोगस दिव्यांग  असल्याच्या बतावण्याकरून शासनाची दिशाभूल करून बदली प्रक्रियेत व इन्कम टॅक्स मध्ये फायदा घेणाऱ्याच्या विरोधात आंदोलन छेडले आहे या संदर्भात वेळोवेळी संबधीत अधिकारी यांच्यात कडे तक्रारी व पाठपुरावा देखील केलेला आहे  दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या संबंधीत विधान परिषदेत  माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता तरी देखील तांत्रिक अडचण समोर करून आपल्या जि. प. मधून माहिती दिल्या गेली नव्हती,वेळोवेळी माहिती मागुन देखील कुठे तरी बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्या जात असल्याचे आधीच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती वरून  दिसत होते,परंतु आपण या विषयी योग्य ती चौकशी करून तात्काळ माहिती द्यावी अशी मागणी प्रशांत पाटील यांनी केली होती व  माहिती न मिळाल्यास  रयत क्रांती संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने लढा दिल्या जाईल असे रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितले होते परंतु अद्याप ही माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने शिक्षण विभागाने स्मरणपत्राद्वारे ज्या शिक्षकांना माहिती देण्यास विलंब  झाला आहे त्यांनी तीन दिवसात माहिती शिक्षण विभागाला माहिती देण्याचे स्मरणपत्राद्वारे कळवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.