काळानुरूप बदल स्वीकारणाऱ्या दै. लोकशाहीची दिनदर्शिका म्हणजे वाचकांसाठी महत्वाचे पाऊल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

‘बदल हा सृष्टीचा नियम आहे. काळाप्रमाणे ज्याने बदल स्वीकारले तोच टिकला आणि टिकेल. हा बदल लोकशाही समूहाने स्वीकारला असे गौरवोद्गार भरत अमळकर यांनी काढले.

लोकशाही दिनदर्शिका 2022चे प्रकाशन केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते भरत अमळकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

1955 पासून लोकशाही समूह मीडिया क्षेत्रात पाय रोवून उभा आहे. काळानुरूप झालेले सर्व बदल दै. लोकशाहीने स्वीकारले म्हणून मुद्रीत वृत्तपत्राबरोबरीने वेबसाईट, युटू, फेसबुक, ऍप आणि सर्वच सोशल मीडियाशी जोडले गेले आहे.  वाचकांसाठी उपयुक्त ठरणारी दिनदर्शिका हे  दै. लोकशाहीचे महत्वाचे पाऊल होय’ असेही अमळकर यांनी स्पष्ट केले.

दै. लोकशाहीच्या लोक लाईव्ह स्टुडिओत झालेल्या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून भरत अमळकर, डॉ. अमित भंगाळे व डॉ. सौ. भंगाळे तसेच श्री समर्थ बॅटरी सेंटरचे संचालक योगेश पाटील उपस्थित होते.

सुरूवातीला दै. लोकशाहीचे संचालक राजेश यावलकर यांनी प्रास्ताविक करून दै. लोकशाही दिनदर्शिकेचे संदर्भात तसेच दै. लोकशाहीच्या बदलत्या स्वरूपासंदर्भात माहिती दिली. भरत अमळकर यांचे लोकशाहीचे सल्लागार संपादक धों.ज. गुरव यांनी  गुलाबाचे रोप देऊन स्वागत केले. तर डॉ. अमित भंगाळे आणि सौ. डॉ. नेहा भंगाळे यांचे स्वागत समूह संचालक राजेश यावलकर यांनी तर श्री समर्थ बॅटरी सेंटरचे संचालक योगेश पाटील यांचे स्वागत जाहिरात व्यवस्थापक विवेक कुळकर्णी यांनी केले.

प्रसंगी डॉ. अमित भंगाळे, योगेश पाटील यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. तर धो ज गुरव यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले.

डिजीटल प्रमुख कु. कविता ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन कु. शालिनी कोळी हिने केले.

या प्रकाशन सोहळ्याला लोकशाही परिवारातील सौ. शुभांगी यावलकर, प्रसाद जोशी, अनिकेत पाटील उपस्थित होते.

लोकशाही समूहाने निर्मित केलेल्या विविध चित्रफितीचे सर्व मान्यवरांनी अवलोकन केले

Leave A Reply

Your email address will not be published.