ठाकरे मंत्रिमंडळाचा आज विस्तार ; कोणाला मंत्रीपद मिळणार?

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकासआघाडी (शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस) सरकारचा आज, सोमवारी दुपारी १ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असून तिन्ही पक्षांचे एकूण ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. दरम्यान, तिन्ही पक्षांनी आपापसांत कोणती खाती वाटून घ्यायची हे निश्चित झाले असले तरी पक्षांतर्गत खातेवाटपाचा घोळ मात्र रात्री उशिरापर्यंत सुरू होता. संभावित यादी समोर आली असली तरी कोणाला मंत्रीपद मिळणार? कोणाला डावलणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

विधानसभेच्या प्रांगणात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विधिमंडळ परिसरातील पार्किंगच्या जागेत मुख्य स्टेज आणि त्याला लागूनच भव्य मंडप उभारण्यात आला आहे. याठिकाणी सुमारे ५०० ते ७०० आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपामध्ये १२ पेक्षा जास्त स्क्रीन उभारण्यात आले असून विधिमंडळ परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

शिवसेना : गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, सुनील प्रभू, अनिल परब, शंभुराजे सरप्रताप सरनाईक किंवा रवींद्र फाटक, रवींद्र वायकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, उदय सामंत, भास्कर जाधव किंवा वैभव नाईक, आशीष जैस्वाल किंवा संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड.

काँग्रेस : अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, संग्राम थोपटे, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, के. सी. पाडवी, अमिन पटेल.

राष्ट्रवादी काँग्रेस : अजित पवार, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. किरण लहामटे, आदिती तटकरे.

Leave A Reply

Your email address will not be published.