मुलींनी दिला वडिलांना खांदा

0

जळगाव- पुरुषप्रधान संस्कृतीत मुलांना मुलींपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते मात्र ती बाब आता काळाच्या ओघात हळूहळू लोप पावत चालली आहे

जळगाव .मृत्यूनंतर पार्थिवाला मुलाने खांदा द्यावा आणि त्यानेच अग्निडाग द्यावा अशी प्रथा आहे मात्र या सर्व रीतिरिवाजांना फाटा देत जळगाव जिल्ह्यातील मोहाडी   रोडवरील माजी सैनिक सोसायटीतील जळगाव येथे तिघा मुलींनी वडील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला

ऍडव्होकेट रमेश गुलाबराव धम्मारत्न बिऱ्हाडे हे इंडियन एअर फोर्स मधे एअर फील्ड सेफ्टी ऑफिसर म्हणून त्यांनी 15 वर्ष आग्रा जम्मू बंगलोर येथे जॉब केला ह्या काळात त्यांनी 61.65.71 चा युद्धात त्यांचा मोलाचा वाटा सहभाग होता त्यानंतर 1975 मधे रिटायरमेंट त्यानंतर त्यांनी मुंबई येथे दारूबंदी अधिकारी तसेच समाज कल्याण अधिकारी म्हणून ते कार्यरत होते या काळात त्यांनी  LLB .MA .. जनरलिझम डिप्लोमा उरलेले शिक्षण पूर्ण केले

.त्यावेळी संपूर्ण परिवार जळगाव ला ठेऊन त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवले ..2000 ला दारूबंदी अधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी असताना रिटायरमेंट नंतर चाळीसगाव ला त्यांनी MLA साठी निवडणूक लढवली आणि जिकले पण म्हणतात न राजकारण मधे चांगली लोक टिकत नाही तसेच यांच्या सोबत पण झालं नंतर ते व्हिजिटिंग लेक्चरल म्हणून मणियार law कॉलेज मध्ये एक उत्तम इंग्रजी वर प्रभुत्व असलेले शिक्षक झाले ह्या माणसाने सर्व आयुष्य समाजसेवक म्हणून आणि समाजाला अर्पण करून घेतले होते शिक्षण फक्त आणि फक्त शिक्षण आपल्या समाजाला आरक्षित करू शकतो  आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू यांचा विचारांचा वारसा जपला व तो पुढे घेऊन घेले

तांबापूर आणि समातानागर जळगाव  मधे त्यांनी तरुण पिढीला मार्ग दाखवला खूप मुलांची जबाबदारी स्वीकारली त्यांनी मुलींना मुलगी म्हणून कधीही कमी लेखले नाही त्यांना आपल्या मुलींना उच्च शिक्षित केले …पढाई के साथ लढाई ही शिकवण मुलांना  आणि समाजाला दिली हा माणूस सेम टू सेम आंबेडकरांसारखा दिसत होता .आणि त्यांचा अनुयायी होता अधिकारी असताना पण आणि नंतर ह्या माणसाचा साधेपणा कमाल होता चळवळ पुढे नेण्याचे काम त्यांनी केले

तसेच त्यांच्या मुली संघमित्रा सुजाता चित्रांग  ह्या आज वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत

संघमित्रा संदनसिंग सर्वत मोठी मुलगी

Joint Law officer

सुजाता  सुरवाडे

Astt . Pharmacy officer at central railways

सर्व लहान मुलगी

Steno typist Law department म्हणून कार्यरत आहेत तिन्ही मुलींचा त्यांना अभिमान होता त्यांनी मुले मुली समान म्हणून असल्याचा संदेश नेहमी दिला मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण दिलें.. आणि आता पर्यत त्यांनी सर्व  घराला संबळले

आजारामुळे त्यांचे निधन झाले मुलींनी आपले दुःख आवरत बापाला खांदा दिला मुलींच्या खांद्या वरून निघालेली आणि मी बघितलेली पहिली अंत्ययात्रा नव्या युगाची दिशा ठरली.

Leave A Reply

Your email address will not be published.