बोदवड भाजपा तालुकाध्यक्षपदी विनोद कोळी यांची निवड

0

बोदवड – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठक सभागृहात बोदवड तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात विनोद दत्तु कोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे,खा.श्रीमती रक्षाताई खडसे,जे.डी.सी.सी.बँक अध्यक्ष रोहिणीताई खडसे,भाजपा जळगाव जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे,निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन,भाजपा जेष्ठ कार्यकर्ते अनंतराव कुलकर्णी,डॉ.वैष्णव,भाजपा जिल्हा चिटणीस कैलास चौधरी,माजी भाजपा तालुकाध्यक्ष भागवत टिकारे,जि.प.सदस्य भानुदास गुरचळ व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.