ग्रामस्थांना दारू पाजून मते वळविण्याचा केवीलवाणा प्रकार!

उबाठा गटाचे असेही राजकारण : करण पवार यांच्याबद्दल महिलांमध्ये चिड

0

जळगाव ;- आपल्यापासून मतदार दूर जात असल्याच्या भीतीने पोटात गोळा उठलेल्या शिवसेना (उबाठा) गटाने आता खालची पातळी गाठली आहे. तरुणांना हाताशी घेवून गल्लोगल्ली दारुचे आमिष दाखविले जात असून दारु पाजून मते घेण्याचा केविलवाणा प्रकार सध्या जळगाव लोकसभा मतदारसंघात सुरु आहे. तरुणांना दारुचे व्यसन लावले जात असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार (पाटील) यांच्याबद्दल महिला वर्गात चिड निर्माण झाली आहे.

 

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मिता वाघ यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार हे साम-दाम-दंड-भेद यांचा वापर करीत असून बऱ्याच ठिकाणी दारु पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. ऐकीकडे बेरोजगारी, अवैध धंदे, वाढती व्यसनाधिनता यावर ‘व्याख्यान’ देणाऱ्या शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवारानेच दारुचे आमिष दाखविण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील तरुणांना हाताशी घेवून दारु पार्ट्यांचे आयोजन केले जात असून मते मागितली जात आहेत.

तरुणांना दारु पार्ट्या देण्यात येत असल्याने महिलांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे. मध्यंतरी असाच प्रकार चाळीसगाव तालुक्यातील गोरखपूर येथे घडला होता. या ठिकाणी देखील एका व्यक्तीला दारु पाजून भाजपाच्या एलर्इडी व्हॅनला विरोध करण्यास भाग पाडले होते. दुसऱ्या दिवशी विरोध करणाऱ्या व्यक्तीने आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या स्थानिक कार्यकर्त्याने दारु पाजून हे कृत्य करण्यास भाग पाडले होते असे सांगितलेे. अशा प्रकाराने शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार करण पवार यांना झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रेमसिंगचे ‘प्रेम’ भाजपावरच !
चाळीसगाव तालुक्यातील गोरखपूर येथील घटना अगदी ठरवून कट रचून केली असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते. ज्या व्यक्तीचा हा व्हिडीओ बनवला आहे तो पूर्णत: कट रचून केल्याचे दिसते, याबाबत दुसऱ्या दिवशी सदर व्यक्ती प्रेमसिंग जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्याने रात्री काय झाले हे माझ्या लक्षात नसून गावातील उद्धव ठाकरे (उबाठा) गटाच्या कार्यकर्त्याने आम्हाला दारू पाजून विरोध करायला लावला असल्याचे सांगितले. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असून झालेल्या प्रकाराबद्दल त्याने माफी देखील मागितली. यामुळे उबाठा गटाचा गलिच्छ चेहरा उघड झाला असून बनावट कट कारस्थानाच्या माध्यमातून विरोधी पक्षाची बदनामी करण्याचे काम जनतेसमोर आले आहे.

महिलांमध्ये प्रचंड चिड
घरातील कर्त्या पुरुषांना व तरुणांना शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार करण पवार हे दारुचे व्यसन लावत असल्याने महिलांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे. व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे क्रमप्राप्त असतांना देखील करण पवार यांची ही धडपड समाजासाठी बाधक ठरत आहे. दरम्यान, या घटनेमुळे उबाठा गटाबद्दल सर्वत्र संतापीची लाट उसळली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.