मंत्रिमंडळ विस्तार; काँग्रेसच्या दहा मंत्र्यांची अधिकृत यादी

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकासआघाडी (शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस) सरकारचा आज, सोमवारी दुपारी मंत्रिमंडळ विस्तार होणार यात ३६ मंत्री शपथ घेणार आहेत.  दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या काँग्रेस आमदारांची अधिकृत यादी समोर आली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, के सी पाडवी, विजय वडेट्टीवार यांच्यासह 10 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.आतापर्यंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर नाना पटोले यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्षपदाची माळ पडली आहे.

काँग्रेसमधून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी 

अशोक चव्हाण (कॅबिनेट मंत्री) – भोकर (नांदेड)

के सी पाडवी (कॅबिनेट मंत्री) – अक्कलकुवा (नंदुरबार)

विजय वडेट्टीवार (कॅबिनेट मंत्री) – ब्रह्मपुरी (चंद्रपूर)

अमित देशमुख (कॅबिनेट मंत्री) – लातूर शहर (लातूर)

सुनिल केदार (कॅबिनेट मंत्री) – सावनेर (नागपूर)

यशोमती ठाकूर (कॅबिनेट मंत्री) – तिवसा (अमरावती)

वर्षा गायकवाड (कॅबिनेट मंत्री) – धारावी (मुंबई)

अस्लम शेख (कॅबिनेट मंत्री) – मालाड पश्चिम (मुंबई)

सतेज पाटील (राज्यमंत्री) – कोल्हापूर (विधानपरिषद)

डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) – पलुस कडेगाव (सांगली)

Leave A Reply

Your email address will not be published.