जळगावातील बंद घरातून हजारोंचे दागिने लांबविले

0

जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरात असणाऱ्या रामचंद्र नगर मध्ये अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोयंडा तोडून घरातील 41 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार एक ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की अयोध्या नगर परिसरात असणाऱ्या रामचंद्र नगर मधील रहिवासी नरेंद्र मानसिंग पाटील वय 32 हे व्यापारी असून त्यांच्या बंद घरातून दरवाज्याची कडी व कोंडा चोरून बेडरूम मधील लोखंडी कपाटात लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या चार अंगठ्या ,कानातील साखळ्या, सोन्याची चैन ,चांदीचे ब्रेसलेट ,पैंजण ,चांदीचे कडे , आदी सोन्या-चांदीचा एकूण 41 हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरल्याची घटना एक ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.