जळगाव;- सध्या सोन्याच्या दरामध्ये किंचित वाढ तर चांदीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत असून सोन्याचे भाव हे सरासरी दहा ग्रॅमला कालच्या तुलनेत आज बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत तीनशे रुपयांनी वाढून सोने प्रति दहा ग्रॅम ला ६० हजार २७०रुपये झाले होते.
आज जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरातही गेल्या काही दिवसांपासून घसरण दिसून येत असून चांदी एक ऑगस्ट रोजी प्रति किलो ७४ हजार ५० वरून आज चांदीच्या भावात प्रति किलो ४१० रुपयांची वाढ झालेली दिसून आली. चांदी प्रति किलो ७४ हजार ४६० रुपये इतका दर होता.
दरम्यान चांदीच्या दरामध्ये गेल्या आठवड्यात दोन हजार रुपयांची घसरण झाले असून 27 जुलै रोजी 76 हजार रुपये प्रति किलो इतका भाव चांदीला मिळाला होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ आणि घसरण पाहायला मिळाली.