ऑगस्टमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद; पहा यादी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या ऑगस्ट महिना सुरु असून तुम्हाला देखील बँकांची कामे करायची असतील तर हि बातमी नक्की वाचा. ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँकेने बँकांना तब्बल 14 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. म्हणून बँकेत जाण्याआधी ही सुट्ट्यांची यादी नक्की वाचाच..

 

बँकांच्या सुट्ट्यांची यादी

6 ऑगस्ट – रविवारी देशभरात बँकांना सुट्टी राहील.
8 ऑगस्ट – रम फाटच्या कारणास्तव गंगटोकमधील तेंडोंग लो येथे बँकांना सुट्टी दिली जाणार आहे.
12 ऑगस्ट – देशात दुसऱ्या शनिवारी बँकेला सुट्टी.
13 ऑगस्ट – रविवारी देशभरातील बँका बंद.
15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात बँकांना सुट्टी.
16 ऑगस्ट – पारशी नववर्षानिमित्त मुंबई, नागपूर आणि बेलापूरला बँकांना सुट्टी.
18 ऑगस्ट – श्रीमंत शंकरदेव तिथीनिमित्त गुवाहाटीमध्ये बँक बंद राहतील.
20 ऑगस्ट – रविवारी देशभरातील बँका बंद.
26 ऑगस्ट – चौथ्या शनिवारी देशभरातील बँका बंद राहणार.
27 ऑगस्ट – रविवारी देशभरातील बँकांना सुट्टी.
28 ऑगस्ट – ओणमसाठी कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँकेला सुट्टी मिळणार.
29 ऑगस्ट – तिरुओनममुळे कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद.
30 ऑगस्ट – रक्षाबंधनामुळे जयपूर आणि शिमल्यात बँकेला सुट्टी असणार.
31 ऑगस्ट – डेहराडून, गंगटोक, कानपूर, कोची, लखनौ आणि तिरुअनंतपुरममध्ये रक्षाबंधन/श्री नारायण गुरु जयंती/पंग-लाहबसोलमुळे बँकांना सुट्टी असणार.

 

Leave A Reply

Your email address will not be published.