खळबळजनक; गोंडगाव येथे आठवर्षीय मुलीचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

0

गोंडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गोंडगाव (ता.भडगाव) येथील गावात एका आठवर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. मंगळवार दि. 1 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून, हा नरबळी कि लैंगिक अत्याचार? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. याबाबत पोलीस यंत्रणा तपास करीत आहे.

याबाबत माहिती अशी की, गोंडगाव ता. भडगाव येथील आठवर्षीय मुलगी दि. 30 जून रोजी दुपारी दोन ते सहा वाजे दरम्यान बेपत्ता झाल्याची तक्रार भडगाव पोलीसात दाखल करण्यात आली. दरम्यान पोलिस प्रशासनाची शोध मोहीम सुरू असतांनाच, आज दि.1 ऑगस्ट रोजी मयत मुलीचा स्वतःच्या घराला लागून असलेल्या बखड जागेत टाकलेल्या चार्याच्या कुट्टीतुन उग्र वास येत असल्याचे येथील काही नागरिकांना समजले. तेव्हा याठिकाणी जाऊन बघितले असता, मयत कल्याणी संजय पाटील वय 8 या बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळून आला. यावेळी नागरिकांनी पोलीसांना या घटनेची माहिती दिली असता सहायक पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, एपीआय चंद्रसेन पालकर, पोलिस नाईक नरेंद्र विसपुते, पोलिस रविंद्र पाटील, छबुलाल नागरे, भडगाव पोलिस अधिकारी दाखल झाले. यावेळी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नरबळी की लैंगिक अत्याचारातून खून ?
मयत कल्याणी पाटील दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्यानंतर गावातील नागरिकांनी अनेक ठिकाणी शोध घेतला होता, माञ मयत कल्याणी पाटील कुठेच आढळून आली नाही. यामुळे गावात अनेक चर्चांना उधाण आले होते. दरम्यान गावातच कल्याणीचा मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु, ही घटना कशामुळे घडली याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहे तरी सदरची घटना नरबळी कि लैंगिक अत्याचारातून तर घडली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आवाहन आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.