मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिग्गज कालदिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी उचललेल्या टोकाच्या पावलामुळे खळबळ माजली आहे. माहितीनुसार, नितीन देसाई यांनी बुधवारी सकाळ ४.३० च्या सुमारास आपल्या स्टुडिओ मध्ये स्वतःची जीवन यात्रा संपवली आहे. या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. असं म्हंटल जात आहे की, आर्थिक अडचणी वाढल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं. पण, आता त्याच्या निधनानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता नितीन देसाई यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मोबाईलमधील ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागली असून, ऑडिओ क्लिपमध्ये चार जणांचं नाव असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या ऑडिओ क्लिपची सध्या चर्चा रंगत आहे, मिळालेल्या ऑडीओ क्लिपची पडताळणी फॉरेन्सिक टीम करत आहे. नितीन देसाई यांनी काही लोकांची नावे या ऑडीओ क्लिपमध्ये रेकॉर्ड केल्याची माहिती देखील समोर येत आहे. घेतलेली नाव कोणाची आहे, ते अद्याप काली शकलेले नाही. ऑडीओ क्लिपची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. शिवाय नितीन देसाई यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या ऑडिओ क्लिप त्यांच्याच आवाजातील आहेत का? हे सुद्धा तपासले जात आहे.
सोबतच, १८० कोटींचं कर्ज त्यांच्यावर असून तीच रक्कम आता २५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याच समजत आहे. नितीन देसाई यांनी स्वतःला संपवलं आहे आणि या मागे आर्थिक विवंचनेचं कारण आहे का? त्यांना कोण त्रास देत होतं.. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या सर्वत्र नितीन देसाई यांच्या निधनानंतर खळबळ माजली आहे.