काय सांगता? सीमा हैदर करणार बॉलीवूड मध्ये पदार्पण !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सीमा हैदर (Seema Haider) प्रकरण शांत होण्याचं नाव काही घेत नाही आहे. रोज नवीन नवीन माहिती समोर येत आहे. आता पाकिस्तान मधून सीमा भारतात येते काय, तिच प्रेम प्रकरण उघड होत काय, तिला प्रसिद्धी मिळते काय, एवढच काय तर तिला अटक करून चौकशी केली जाते खरी पण, पुढे त्याच काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता तर नवीन माहिती अशी की, सीमा हैदरला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. काय तर म्हणे, पाकिस्तानी सीमा हैदरला बॉलिवूड निर्माता अमित जानी यांच्याकडून चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. एवढाच नाही, तर सचिन मीनालाही  (Sachin Meena)बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची ऑफर आली आहेत.

सीमा हैदर करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
पाकिस्तानातून पळून आलेली सैम हैदर आणि सचिनची प्रेमकहाणी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही, मात्र आता सीमा हैदर खऱ्या आयुष्यात बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सीमा आणि सचिनला आता चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. एका निर्मात्याने त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली असून, त्याने त्यांना मदतीचा हात दिला आहे. दरम्यान, हा चित्रपट त्यांच्या प्रेमकथेवर आधारित नसून राजस्थानमधील टेलर कन्हैयाच्या हत्येवर आधारित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.