जमिनीचे जुने रेकॉर्ड ऑनलाईन पहायचे आहेत ? ही पद्धत वापरा..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सर्वच क्षेत्रांमध्ये आता डिजिटलायझेशन झाले आहे. या अनुषंगाने आता शेतजमिनीच्या ७/१२ चा रेकार्ड देखील ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. तसेच शेतजमिनीच्या ७/१२ मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. याविषयी जाणून घेऊया अधिक माहिती..

शेतकऱ्यांना जमिनीचे खटले, दावे, फेरफारे कुठून आलेली आहेत याची माहिती असणे गरजेची आहे. अशी अनेक कागदपत्रे पहायची असतात आणि ही कागदपत्रे काढण्यासाठी शेतकऱ्यांना शासन दरबारी खूप हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आता असे होणार नाही. आता तुम्ही घरी बसून सर्व माहिती काढू शकतात.

१८८० पासूनचे रेकॉर्ड ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यामातून एक पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरती सुरुवातीला फक्त ७ जिल्ह्यांचा समावेश होता. २१ जिल्ह्यांची ६४ प्रकारची कागदपत्रे या पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेली आहेत. जे नागरिकांना सहज घरबसल्या उपलब्ध होतील.

या पद्धतीचा अवलंब करावा..

१) सर्व प्रथम महाभूलेख या पोर्टलवरती जा. किवा आपले भूलेख म्हणून सुद्धा सर्च करू शकता.
२) पुढे user id password टाकून log in करा. Capcha code टाका.
३) Account नसेल तर regitration करा.
४) Regitration करताना सर्व माहिती भरा.
५) पुढे तुमचा लॉग आयडी दाखवला जाईल.
६) Password ठेवा.
७) पुढे user id व password तसेच capcha code टाकून लॉग इन करा.
८) नंतर बेसिक सर्च व advance सर्च ऑप्शन येईल.
९) पुढे तुमचा जिल्हा, तालुका, गाव सर्च करा.
१०) कोणते कागदपत्र हवं हे विचारल जाईल. ६४ कागदपत्रापैकी कोणते काढायचेत ते निवडा.
११) पुढे गट नंबर सर्वे नंबर टाका, फेरफार नंबर असेल तर तो द्या.
१२) पुढे सर्च करा. वर्षानुसार फेरफार दिसतील. त्यातील तुम्ही डाऊनलोड करा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.