CBI मध्ये ‘या’ पदाची भरती; तब्बल 40,000 पगार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सल्लागार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

अर्जाची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सल्लागार (Consultant) – एकूण जागा 04, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सल्लागार (Consultant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून, विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी सेवानिवृत्त असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पोलीस निरीक्षक किंवा त्याहून मोठ्या पदावरून निवृत्त असणं आवश्यक आहे.

अनुभव आणि पगार

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. पोलीस निरिक्षक किंवा त्यावरील पदांवर असताना कायद्याचा आणि कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कायदा, कोर्ट, कोर्टाचं कामकाज आणि पैरवी याबाबत सखोल अनुभव असणं आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 40,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे. यासोबत इतर सुविधाही दिल्या जाणार आहेत.

अशाप्रकारे अर्ज भरावा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सुरुवातीला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. यानंतर उमेदवारांच्या अनुभवानुसार आणि पात्रतेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. निवड किंवा शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीला बोलवण्यात येणार आहे. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो,

अर्ज पाठवण्याचा पत्ता/ ई-मेल आयडी

शाखा प्रमुख सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अँटी करप्शन शाखा 9वा मजला, सी-35ए, जी-ब्लॉक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 098 / [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.