काँग्रेस-राष्ट्रवादी नांदेडमधून फुंकणार प्रचाराचे रणशिंग

0

मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली. नांदेड येथील बुधवारी दि.२० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता स्टेडियम परिसरातील इंदिरा गांधी मैदानावर आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा आयोजित केली असून या सभेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी यांच्यासह महाआघाडीतील घटकपक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

यांची राहणार उपस्थिती
या संयुक्त प्रचार सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा.मल्लीकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे,माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गुजरात काँग्रेसचे प्रभारी खा.राजीव सातव, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री आ.डी.पी.सावंत, आदींची उपस्थिती लाभणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.