‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

0

गांधीनगर :- गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा म्हणजेच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याचा एक ईमेल सुरक्षा यंत्रणेला मिळाला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. ‘स्टॅच्यू अॉफ युनिटी’च्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटीसह गुजरातमधील अनेक प्रार्थनास्थळे आणि महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर हल्ला करण्यात येणार असल्याचे ईमेलमध्ये म्हटले आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, ईमेलची सत्यता पडताळण्याचे काम सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.