कनाशी देव्हारी येथे शिवसेना-युवासेना शाखेचे उदघाटन  

0

भडगाव दि.११-

दिनांक ८ रोजी संध्याकाळी ६ वाजता गुरुवार रोजी कार्यसम्राट आमदार श्री.किशोर आप्पा पाटील, श्री.गणेश आण्णा परदेशी (शिवसेना जळगाव उपजिल्हा प्रमुख),श्री डॉ. विलास पाटील (शिवसेना भडगाव तालुका प्रमुख),श्री.जे.के.पाटील(विधानसभा क्षेत्र प्रमुख),श्री.लखीचंद पाटील(युवासेना जळगाव जिल्हा सरचिटणीस),श्री.रवी पाटील(युवासेना भडगाव तालुका प्रमुख)श्री. शशिकांत पाटील(युवासेना उपतालुका प्रमुख) राहुल पाटील,गोंडगाव,अनिल महाजन,कजगाव उदय पाटील,निंभोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना-युवासेना शाखेचे उदघाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.शाखा उद्घाटनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांसोबत गावातील वरिष्ठ मंडळी यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना-युवासेना कनाशी-देव्हारी शाखा पदाधिकारी व सर्व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.