विस्तव फेकून कपाशी गंजीला आग लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

शेतकऱ्याचे ७ ते ८ क्विंटलचे नुकसान,आरोपीस जामीन

लोहारा दि.११-

येथुन जवळच असलेल्या म्हसास गावी साठवून ठेवलेल्या कपाशी गंजीस आग लावून पेटविण्याचा प्रयत्न करीत आर्थिक भुर्दंड देण्याचा प्रयत्न केल्याची घटना दिवाळीच्या दिवशी घडली असल्याची तक्रार शेतकऱ्याने दिली होती. याबाबत पोलिसांनी सदर आरोपीस अटक करून पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.८ रोजी जामिनावर संशयीत आरोपीची जामिनीवर मुक्तता केली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, म्हसास येथील शेतकरी अशोक तुळशीराम पाटील(वय-५५) यांचे म्हसास-पाचोरा मार्गावरील वळणावर स्वमालकीचे पत्र्याचे शेड असून त्याचा सतत ५ वर्षांपासून शेतात पिकवलेले पिक ठेवण्यासाठी गोदाम म्हणून वापर करतात.यंदाही जवळपास ८० ते १०० क्विंटल कपाशी भरून ठेवलेली आहे. दिवाळीच्या दिवशी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास गावातील वामन मन्सराम पाटील हा त्याच्या हातात जळाऊ काडीचे विस्तव घेऊन आला व फेकुन पळून गेला ही बाब त्वरीत लक्षात आल्याने बाकी होणारे नुकसान टळले पण यामुळे कपाशी ७ ते ८ क्विंटल जळून खाक झाली. याबाबत लोहारा पोलीस दुरक्षेत्र कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रजि भाग-५,गुरनं.४०/२०१८,भादवि-कलम ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ.आर.के.पाटील हे करीत आहेत. सदर प्रकार पूर्ववैमनस्यतून घडला असल्याची गावात चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.