ग्रामस्थांनी पकडून दिले पं.स. सभापतींनचे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर

0

वेरुळी बुद्रुक येथे अडीच तास राडा

पाचोरा दि.११-

पाचोरा पंचायत समितीचे सभापती बंन्सीलाल पाटील यांचे विना नंबर असलेले अवैध रित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर वेरुळी बुद्रुक येथील दोनशे ते अडीचशे नागरिकांनी पकडून तहसिलदार बी. ए. कापसे, पोलिस कॉन्स्टेबल किरण पाटील, दिपक सुरवाडे, सचिन निकम, चालक दामोदर सोनार यांचे ताब्यात दिले. यावेळी सुमारे अडीच तास राडा झाल्यानंतर तहसिलदार व पोलीसांनी ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात जमा केले.

          पाचोरा पंचायत समितीचे भाजपचे सभापती असलेले बंन्सीलाल रामदास पाटील यांचे ट्रॅक्टर अनेक दिवसांपासून हिवरा, बहुळा नदिच्या संगमाजवळून अवैध रित्या वाळूची वाहतूक करीत होते. दिनांक ८ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान नदिपात्रातून वाळूचे भरलेले ट्रॅक्टर वेरुळी बुद्रुक गावहून जात असतांना माजी सरपंच विजय (बाळू) पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, माजी उपसरपंच अरुण कुमावत, भाऊसाहेब कुमावत, गोरख भिल, सदाशिव भिल, मनोज भालेराव, संजय पाटील, बाळू पाटील सह दोनशे ते अडीचशे नागरिकांनी ट्रॅक्टर अडवून चालकास विचारना केली असता त्याने सदरचे ट्रॅक्टर पंचायत समितीचे सभापती बंन्सीलाल पाटील यांचे असल्याचे सांगून नागरीकांशी हुज्जत घातली. सुमारे अडीच तास चाललेल्या राड्यानंतर नागरिकांनी तहसिलदार कापसे यांचेशी संपर्क साधल्याने कापसे यांनी तातडीने पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वेरूळी गाठले. व सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान ट्रॅकर तहसिल आवारात जमा केले. तहसिलदार कापसे हे तहसिल कार्यालयात जमा करतात की नाही यासाठी खात्री करण्यासाठी गावकऱ्यांनी वीस मोटरसायकली घेऊन तहसिलदार यांचा कार्यालयापर्यंत पाठलाग केला.

आमच्या गावचा माणुस जेल मध्ये पाठविला, आम्ही भाजपा वाल्यांचे ट्रॅकर कसे चालु देणार

    पाचोऱ्यात गेल्या महिन्यात पाणी टंचाईच्या आढावा बैठकीस सभापती बन्सीलाल पाटील यांनी ग्रामसेवकांना उपस्थितीत राहु न दिल्याने पंचायतीत जावुन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राडा केला होता. याप्रकरणी सेनेच्या १३ पदाधिकाऱ्यांवर दंगा व शासकीय कामात अडथळाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सेनेचे तालुकाप्रमुख शरद पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, जि.प. सदस्य पदमसिंग पाटील यांना अटक केल्याने न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने सेनेचे तिन्ही पदाधिकारी दिवाळी सारख्या सणी कारागृहात आहेत. यातील तालुका प्रमुख शरद पाटील हे वेरुळी खुर्द येथील असल्याने आमच्या गावचा माणुस भाजपा वाल्यांनी जेल मध्ये पाठविला आहे. तर आम्ही भाजपा वाल्यांचे अवैध वाळूचे ट्रॅकर कसे चालु देणार असा संताप व्यक्त करून अडिचशे गावकऱ्यांनी राडा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.