अमळनेरात दुचाकीची उभ्या ट्रॅक्टरला धडक ; दांपत्य ठार

0

अमळनेर;- उभ्या ट्रॅक्टरला भरधाव जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास गांधली रस्त्यावर सप्तशृंगी मंदिराजवळ घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील पिळोदा येथील युवराज दयाराम पाटील (वय ६२) व त्यांच्या पत्नी मंगलबाई युवराज पाटील (वय ५५) हे दुचाकीने पारोळा येथे गेले होते. सायंकाळी गावाकडे परत येत असताना सप्तशृंगी मंदिराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक लागली. त्यात युवराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर मंगलबाई यांचा श्वास सुरू असल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काही वेळातच उपचार घेताना त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात भाऊ व दोन मुली आहेत.

दरम्यान अमळनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्या मृत्यू प्रकरणी अंमळनेर पोलीस स्टेशनला चालकावर गुन्हा दाखल झाला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.