अखेर शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; निर्भिड पत्रकार संघाचा दणका

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जामनेर  येथील एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने पत्रकारांच्या महिलां अपशब्द वापरून पत्रकारांना घरातून बाहेर काढून मारेल असे वक्तव्य केल्याने खळबळ माजली होती. सदर पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी असे निर्भिड पत्रकार संघाचे वतीने उपजिल्हा प्रमुखांना निवेदन देण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी जामनेर येथील दोन पत्रकार तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा एका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या विनंती वरून बातमी घेण्यासाठी गेले होते. जाण्यापूर्वी सदर पत्रकारांनी केवळ पेट्रोल पाण्याचा खर्च द्यावा लागेल असे म्हटले.सदर ठिकाणी वृत्तसंकलन करण्यासाठी गेल्यावर तिथल्या लोकांनी पत्रकारांना पेट्रोलसाठी खर्च दिला.

सदरची माहिती जामनेर येथील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या कानावर पडली. सदर शिवसेनेच्या “त्या” पदाधिकाऱ्याने दोघा पत्रकारांना फोनवरून झापले. तसेच पत्रकारांच्या महिलांविषयी अपशब्द वापरत एक-एक पत्रकाराला घरातून बाहेर काढून मारेल असे वक्तव्य केले. शिवसेनेच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने असे पत्रकारांविषयी बेताल वक्तव्य केल्याने तालुक्यातील पत्रकार बांधवामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारांना असे धमकावण्याचे प्रकार घडत असून राज्य सरकारने अश्याप्रकारे पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेजबाबदार पदाधिकाऱ्यांना”लगाम” लावण्याची गरज निर्माण झाली आहे. जामनेर येथील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने जामनेर येथील पत्रकारांच्या महिलांविषयी बेताल वक्तव्य करत एक-एक पत्रकाराला घरातून बाहेर काढून मारेल” असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने शहरासह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सदर शिवसेनेच्या “त्या” बेजबाबदार पदाधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निर्भिड पत्रकार संघ (जळगाव जिल्हा) वतीने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ. मनोहर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. “त्या” पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ. मनोहर पाटील यांनी उपस्थित पत्रकारांना दिले. सदर “त्या” पदाधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास निर्भिड पत्रकार संघ महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनिल इंगळे यांनी म्हटले आहे.

सदर शिवसेना पदाधिकारी वर पत्रकार अभिमान झाल्टे व पत्रकार नितीन इंगळे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशन मध्ये भादवी. कलम ५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास जामनेर पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.