पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आडगाव येथे कोरोना लसीकरण संपन्न

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आडगाव गावाचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब पाटील यांनी कोरोनाचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी आडगाव गावातील नागरिकांसाठी लसीकरणाचे आयोजन केले. या लसीकरणासाठी गावातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला असून उत्कृष्ट असा प्रतिसाद जनतेने दिला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बापूराव पाटील, तालुका सरचिटणीस चंद्रकांत धनगर, बूथ संयोजक विजय बाविस्कर, आडगाव चे सरपंच रावसाहेब पाटील, पोलीस पाटील संगीता पाटील, गोविंद बापू ,ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, नाना बाविस्कर, राजू पाटील, दुरला पावरा, रमेश माळी, जीवन पाटील, व नर्स कल्पना पाटील,शिक्षक बापू बहारे, नानीराम बारेला, शिपाई कांतीलाल पाटील, मनोज बाविस्कर हे उपस्थित होते.

या लसीकरणासाठी वैद्यकीय तालुका अधिकारी डॉक्टर लोमटे, डॉक्टर लासूरकर यांचे अनमोल सहकार्य लाभले गावातील नागरिकांनी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब पाटील यांच्या कार्यावर समाधान व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.