जामनेर तालुका देखरेख संघावर भाजपाचा झेंडा….

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील जामनेर तालुका देखरेख संघाच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत माजी मंत्री आ. गिरीष महाजन आणि माजी खा. ईश्‍वरबाबूजी जैन यांच्या सहकार पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध करत दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीसाठी शहरातील वाकी रोड वरील जिल्हा परिषद शाळेत रविवारी मतदान घेण्यात आले. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर संध्याकाळी लागलीच निकालही जाहीर करण्यात आला.

या निवडणुकीत माजी मंत्री आ. गिरीश महाजन आणि माजी खा. ईश्वरबाबुजी जैन यांच्या गटाने सर्वच्या सर्व ११ जागा जिंकल्या व दोन जागा ह्या अगोदरच बिनविरोध झालेल्या होत्या अश्या सर्व १३ जागा ह्या सहकार पॅनलला मिळाल्या.

आमदार गिरीश महाजन व ईश्‍वरबाबूजी जैन यांच्या गटाच्या पतंगाने विजयीची भरारी घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्या कपबशीला चांगलाच शह दिला असल्याचे दिसून आले.

सदर निवडणुकीत अँड. बोरसे, रविंद्र हिंगणे, शामकांत पाटील, विकास महाजन, डॉ. सुरेश पाटील, विश्वनाथ पाटील, विठठ्ल पाटील, मिठाराम धनगर,  ज्ञानेश्वर पाटील, आशाबाई पाटील, सुनंदा पाटील, अरविंद खोडपे या उमेदवारांनी विजयी झाले.

निकालानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांनी निवासस्थानी निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here