खतांच्या किंमतीत वाढ; शेतकरी हवालदिल

0

विवेक कुलकर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क

यंदा पाऊस चांगला झाल्याने विहिरींना पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते, पण ऐन हंगाम सुरू झाला तेव्हा रासायनिक खते कृषी केंद्रावर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच जी रासायनिक खते दुकानावर आहे, त्यांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे.

खतांच्या किंमती

खताचे नाव                      अगोदर       आता 

M. O. P                        975            1350

15-15-15                    1180          1380

16-16-16                   1150          1400

D. A. P                       1200          1300

अमोनियम सल्फाईट      735           875

खताच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकरी सरकारवर नाराज झाले आहे. 2021 चालू वर्षात रासायनिक खतांच्या किमतीमध्ये दोनदा वाढ झाले आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.  अगोदरच गारपीट, ओला दुष्काळ, बोंड आळी या संकटांचा सामना शेतकरी करत आहे, त्यातच हे नवीन संकट उभे राहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.